नसरुद्दिन शहांनी ‘जोकर’ म्हटल्यावर अनुपम खेर संतापले; व्हिडिओद्वारे दिलं सडेतोड उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसांपूर्वी अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांच्यावर भाष्य केलं होत. सीएएच्या विरोधात होणाऱ्या विरोध प्रदर्शनावर अनुपम खेर वारंवार ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देत असतात यावर तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न नसरुद्दिन यांना विचारला गेला होता. त्यावर नसरुद्दिन यांनी अनुपम खेर हे एक जोकर असून त्यांच्या बोलण्याला गंभीरपणे घेण्याची काही आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटलं. कुणाची तरी खुशमद करण्याचा त्यांचा नेहमी स्वभाव राहिला असून तसेच याबाबत खात्री करायची असल्यास टेलीविजन इंस्‍टीट्यूट ऑफ इंडिया (एफटीआईआई) आणि नेशनल स्‍कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मधील त्यांच्या समकालीन असणाऱ्या लोकांशी तुम्ही चर्चा करून पुष्टी करू शकता. असं वक्तव्य शाह यांनी अनुपम खेर यांच्याबाबतीत केलं होत. दरम्यान आता अनुपम खेर यांनी नसरुद्दिन यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर देत ट्विटरवर व्हिडिओद्वारे प्रतिउत्तर दिलं आहे. नेमकं काय म्हणले अनुपम खेर पहा खाली दिलेल्या ट्विटमध्ये…

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

Amazonचे मालक जेफ बेझॉस यांचा फोन हॅक? सौदीचे राजपुत्र महंमद बिन सलमानवर संशय

काही गोष्टी सांगता येत नाहीत, ‘अ‍ॅटलास’ सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीची आत्महत्या

५२ व्या वर्षी अभिनेत्रीनं केलं पाचवं लग्न; कोण आहे ही अभिनेत्री