बॉलिवूड निर्माता साजिद बदलणार कभी ईद, कभी दिवाली’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक; जाणून घ्या नेमके कारण

Sajid Nadiyadwala
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड निर्माता साजिद नाडियादवाला त्याच्या एका चित्रपटादरम्यान अत्यंत व्यग्र आहे. सलमानला घेऊन ‘कभी ईद, कभी दिवाली’ या नावाचा नवाकोरा चित्रपट तो करतो आहे. पण आता या सिनेमाचे शीर्षक बदलण्याचे साजिद नाडियादवालाने पक्के ठरवले आहे. आता साजिद म्हणतोय, या चित्रपटाचे शीर्षक ‘कभी ईद, कभी दिवाली’ नसून ‘भाईजान’ असणार आहे. याचे नेमके कारण असे कि, या चित्रपटाचा नायक सलमान खान आहे. होय.. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत सलमान असल्यामुळेच याचे नाव बदलून ‘भाईजान’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘भाईजान’ हे नाव सलमानच्या चित्रपटासाठी एकदम परफेक्‍ट आहे, असेही साजिदचे म्हणणे आहे.

सलमान खानच्या या चित्रपटाला हेच शीर्षक योग्य न्याय देऊ शकेल, असे साजिद नाडियादवालाला वाटले. म्हणून सलमानबरोबर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या आगामी चित्रपटात सलमानबरोबर पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान आणि पूजा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. याशिवाय आयुष शर्मा आणि झहीर इक्‍बाल हे कलाकार देखील या चित्रपटातील काही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याची माहिती मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CJS5DhkJosI/?utm_source=ig_web_copy_link

नुकतेच ‘टायगर ३′ या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. यामुळे सलमान ‘भाईजान’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा बहुचर्चित चित्रपटदेखील प्रदर्शित झालेला असेल. त्यामध्येही ‘भाई’ शब्द असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर ‘भाईजान’ ठसवण्यासाठी एकप्रकारे मदतच होणार आहे. आतापर्यंत ‘भाईजान’ हे सलमानचे टोपण नाव होते. पण ते आता अधिकृत टोपण नाव होणार आहे आणि तेही त्याच्याच चित्रपटामुळे. सलमान या वर्षात एकापेक्षा एक असे रंजक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येताना दिसतोय. एकंदर हे वर्ष भाईजानच्या नावे असल्याचे दिसत आहे.