अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडॉल १२’ची ‘पोलखोल’; म्हणाले मला जे सांगितलं मी तेच केलं…

0
27
Amit Kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२ हा एक लोकप्रिय सिंगिंग रिऍलिटी शो आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट वर प्रसारित होतो. या शोमध्ये नेहमीच दिग्गजांचे पाहुणे आगमन होत असते. नुकतेच गेल्या विकेंडला ‘किशोर कुमार स्पेशल’साठी किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. दरम्यान या एपिसोडमध्ये जे काही झाले ते पाहून नेटकरी प्रचंड संतापले. नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया या शोच्या दोन जजेसला तर युजर्सनी अक्षरश: फैलावर घेतले आहे. शोमध्ये नेहा व हिमेश यांनी किशोर कुमार यांना ट्रिब्युट देत त्यांची गाणी गायली. ही गाणी ऐकून प्रेक्षकांचा संताप वाढला. याबाबत आता अमित कुमार यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे कि त्यानंतर प्रेक्षकांचा संताप दुप्पटीने वाढला आहे. मला जे करायला सांगितलं मी तेच करत गेलो असे म्हणत त्यांची इंडियन आयडॉल ची पोलखोल केली आहे.

https://www.instagram.com/p/COpc0RTK5bw/?utm_source=ig_web_copy_link

ई-टाईम्ससोबत बोलताना अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल १२’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा एपिसोड पाहूल लोक संतापले आहेत, हे मला माहित आहे. किशोर कुमारसारखे कुणीच गाऊ शकत नाही, हे सत्य आहे. आजच्या तरूणांना किशोर कुमार यांच्याबद्दल काहीही माहित नाही. त्यांना फक्त रूप तेरा मस्ताना हे गाणे माहित आहे.

मी ‘इंडियन आयडल १२’च्या एपिसोडमध्ये गेलो आणि मला जे काही करायला सांगितले होते, तेच मी केले. सर्वांची भरभरून प्रशंसा करण्यास मला सांगितले होते. स्पर्धकांनी कसाही परफॉर्मन्स दिला तरी त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांची प्रशंसा करा, असे मला सांगितले गेले होते. मी तर अ‍ॅडव्हान्समध्ये स्क्रिप्टही मागितली होती. पण त्यांनी ती दिली नाही,’ असे ते म्हणाले.

 

‘इंडियन आयडल १२’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये का गेलात? असे विचारले असता त्यांनी प्रामाणिकपणे पैशांसाठी गेलो अशी कबुली दिली. प्रत्येकाला पैशाची गरज आहे. मी मागितले तेवढे पैसे मला दिले आणि मी शोमध्ये गेलो आणि मी का जाऊ नये? पण ठीक आहे. शो, त्याचे जजेस, स्पर्धक सर्वांबद्दल माझ्या मनात आदर आहे. या एपिसोडमध्ये जे काही झाले, तसे कधीकधी घडते. पण हो, यानंतर किशोर कुमार यांना ट्रिब्युट देत असाल तर यापद्धतीने देऊ नका, असे मी त्यांना सांगेल. मी स्वत: तो एपिसोड एन्जॉय करू शकलो नाही. माझ्या चेह-यावर खूप लाईट पडत होता. मी मुळातच कम्फर्टेबल नव्हतो, असेही त्यांनी सांगितले.

हा सर्व प्रकार अश्या पद्धतीने उघडकीस आल्यानंतर प्रेक्षकांचा संताप आणखीच वाढला असून त्यांनी नेहा कंकर आणि हिमेश रेशमिया याना चांगलेच ट्रोल केले आहे. इंडियन आयडल, कृपा करून किशोर कुमार यांच्या गाण्यांना सोडा. त्यांची गाणी इतक्या खराब पद्धतीने सादर केलेली मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले.

नेहा कक्कर, हिमेश रेशमिया, अनु मलिक व स्पर्धकांनी माझ्या आवडत्या गाण्याचा अक्षरश: बँड वाजवला, असे एका युजरने लिहिले. माफ करा, पण हिमेशने तर किशोर कुमार यांच्या गाण्यांचा अक्षरश: खून केला, अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here