18 वर्षीय तरुणाची व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला VIDEO ठेवून आत्महत्या

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याण मधील एका तरुणाने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला व्हिडीओ अपलोड करून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या १८ वर्षीय तरुणाचे नाव मयूर रामा जाधव असे आहे. त्याने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कल्याणमधील गांधारी पुलावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली पण मयूरचा काही पत्ता लागला नाही. मयूरच्या अशा जाण्याने कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे.

मयूर हा कल्याण पश्चिमेतील बारावे या गावात राहत होता. सोमवारी दुपारी तो घरातील दुचाकी घेऊन गेला तो परत आलाच नाही. त्याअगोदर त्याने चार वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर एक व्हिडीओ अपलोड करत त्यामधून ‘दारू ही माणसाच्या जीवनातील बेकार गोष्ट असल्याचा संदेश त्याने दिला होता. यानंतर त्याने कल्याण पडघा मार्गावरील गांधारी पुलाच्या ठिकाणी जाऊन नदी पात्रात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मयूरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण रात्री उशिरापर्यंत हि शोधाशोध करूनदेखील मयूरचा काहीच थांगपत्ता लागला नाही. यानंतर रात्री हि शोधमोहीम थांबवण्यात आली. यानंतर मयूरचा मृतदेह नदीपात्रातून वाहून गेल्याची भीती अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे. मयूरची दुचाकी रात्री उशीरा पर्यंत पुलाच्या बाजूलाच लावलेली होती.

You might also like