मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट होईल; पोलीस कंट्रोलला फोन

Mumbai Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत (Mumbai)  1993च्या बॉम्बस्फोटाप्रमाणे बॉम्बस्फोट (Blast) घडवून आणू, अशा धमकीचा फोन पोलिस कंट्रोलला करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या फोन प्रकरणी मालाडमधून एकाला पोलिसानी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

मुंबईतील माहीम (Mahim), भेंडी बाजार (Bhendi Bazar), नागपाडामध्ये (Nagpada) बॉम्बस्फोट होण्याचा दावा या फोनवर करण्यात आला आहे. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून लोक आले आहेत असं फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं. धक्कादायक म्हणजे हा बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया प्रकरणासारखीच घटना पुढच्या दोन महिन्यांत मुंबईतही होणार असल्याचंही या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं होतं. यापूर्वी सुद्धा मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचे फोन कॉल आले होते. एटीएसच्या पथकाने तात्काळ फोन लोकेशन ट्रेस करत मालाडमधून एकाला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.