मनोज जरांगेंना मोठा झटका!! मुंबईतील आंदोलनाला कोर्टाची मनाई

jarange patil mumbai high court
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाच्या (Maratha Aarakshan) आरक्षणासाठी लाखोंच्या समुदायाने थेट मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याना मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मोठा झटका दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला हायकोर्टाने मनाई केली आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशावेळी मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. कमीत कमी दोन आठवड्यापर्यंत मनोज जरांगे पाटील याना मुंबईत येता येणार नाही, असंही मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

नेमक काय घडलं?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मोर्चा विरोधात मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणींनंतर कोर्टाने आपले निरीक्षण नोंदवत मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत असं कोर्टाने स्पष्ट केलं. तरीही जर आंदोलन करायचेच असेल तर मुंबईच्या बाहेर, नवी मुंबई, पालघर, ठाणे या परिसरात त्यांना परवानगी देण्यात यावी अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. लोकशाही आणि मतभेद एकत्र येत असले तरी, निदर्शने फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच केली पाहिजेत असं कोर्टाने म्हंटल. कोर्टाच्या या निर्णयामुळे मनोज जरांगे पाटील याना जबर धक्का बसला आहे.

उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणखी आक्रमक झाले. सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली. त्यामुळेच न्यायालयाने असा निर्णय दिला. आता आम्हीही न्यायालयात जाणार आहे. आम्ही आमची बाजू मांडू, असे जरांगे यांनी म्हंटल. तसेच आम्ही कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, न्यायदेवता आम्हाला नक्कीच न्याय देईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. आम्ही उद्या 10 वाजता सगळे मराठे मुंबईचाय दिशेने रवाना होतोय. आमच्या मागण्या रास्त आहेत.असंही मनोज जरांगेंनी सांगितले.