हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे राजकारणी व सेलिब्रिटींना कशी मिळतात? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला केला आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही दिले.
राजकीय नेते व सेलिब्रिटी यांच्याकडे परवाना नाही. त्यामुळे ते वाटपकर्ता असलेली औषधे, ऑक्सिजन चांगल्या दर्जाचा आहे, याची खात्री कोण देणार?’ असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. ‘आम्ही तुम्हाला अहवाल सादर करायला सांगितले तर तुम्ही केवळ कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगता? आम्ही याबाबत समाधानी नाही,’ असे न्यायालयाने म्हटले.
बुधवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला. अहवालानुसार, राज्य सरकारकडून कॉंग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूद याची एनजीओ सूद चॅरिटी फाउंडेशनला करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे; परंतु, अद्याप त्यांची उत्तरे आलेली नाहीत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.