मुंबई । कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असुन सुनावणीला सुरुवात जाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.
Bombay High Court stays BMC's demolition at Kangana Ranaut's property, asks the civic body to file reply on actor's petition pic.twitter.com/VaoeBSOnay
— ANI (@ANI) September 9, 2020
दरम्यान, कंगनाने ट्विट करत आपल्या घरात कोणतंही अनधिकृत बांधकाम नसल्याचं म्हटलं आहे. ट्विटमध्ये कंगनाने लिहिलं आहे की, “माझ्या घरात कोणतंही अनधिकृत बांधकाम नाही. तसंच सरकारने ३० सप्टेंबपर्यंत सर्व प्रकारच्या तोडक कारवाईवर बंदी आणली आहे. बॉलिवूडकरांनो फॅसिझम असं असतं”
मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीर असल्याचा पुनरुच्चार
आपल्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात कंगनाचा पारा चढला. मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केल्याने आधीच वाद निर्माण झालेल असताना कंगनाने पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केला आहे. कंगनाने पालिकेच्या कारवाईवर टीका करणारं ट्विट करत लिहिलं आहे की, मी कधीच चुकीची नसते हे माझे विरोधक वारंवार सिद्द करत असतात. याच कारणाने माझी मुंबई आता पाकिस्तानव्याप्त काश्मीर झालं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.