हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात विचित्र माणसाची काही कमी नाही. काही लोकांसोबत तर अशा घटना घडतात कि त्या ऐकून आपल्यालाच समजत नाही की नक्की या जगात चाललंय काय? अशीच एक घटना नेपाळ मध्ये घडली आहे. पोटात दुखतंय म्हणून एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला आणि त्यांनतर जे काही घडलं ते पाहून डॉक्टर सुद्धा हैराण झाले.
26 वर्षीय नुरसाद मन्सुरी नावाचा हा तरुण नेपाळमधील रौतहाट जिल्ह्यात राहतो. पोटात प्रचंड दुखत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या पोटामध्ये चक्क दारूची बाटली आढळून आली. त्या बाटलीमुळे त्याचे आतडे फाटले होते. यांनतर डॉक्टरांनी तातडीने पोटावर शस्त्रक्रिया करून वोडकाची बाटली बाहेर काढली. जवळपास अडीच तासांच्या ऑपरेशननंतर आता सदर रुग्णावरचा धोका टळला आहे. मात्र एवढी मोठी बाटली त्याच्या पोटात गेलीच कशी हा प्रश्न निर्माण झाला होता.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुरसदला त्याच्या मित्रांनी दारू पाजली आणि त्याच्या गुप्तांगामधून दारूची बाटली जबरदस्तीने टाकली असावी. या घटनेप्रकरणी पोलिसांनी शेख समीम नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून नुरसदच्या काही मित्रांचीही चौकशी केली आहे. आम्हाला समीमवर संशय असल्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे असे चंद्रपूरच्या क्षेत्र पोलिस कार्यालयाने सांगितले. तर नूरसादचे इतर काही मित्र फरार आहेत आणि आम्ही त्यांचा शोध घेत आहोत अशी माहिती रौतहाटचे पोलिस अधीक्षक बीर बहादूर बुधा मगर यांनी दिली.