‘बाला’ ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । आयुष्मान खुराणा हा अभिनेता आता त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर चित्रपट गाजवू शकणारा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लाहला आहे . त्याचे चित्रपट म्हणजे सस्पेन्स, कॉमेडी अशा अनेक भावनांना योग्य न्याय देणारे ठरले आहेत . अंधाधुंद , ड्रीम गर्ल हे त्याचे असे चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवला आणि पोट धरून हसायला देखील लावला .

आता आयुष्मानचा बाला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे . बालाने पहिल्या दिवशी 10.15 कोटी रुपयांनी चांगली सुरुवात केली. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आणि त्याचा थेट परिणाम दुसर्‍या दिवशी पाहायला मिळाला जेव्हा कमाई 15.73 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली . तिसर्‍या दिवशी रविवारी सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळाला. चित्रपटाने रविवारी 18.07 कोटींची कमाई केली .

चा ट्रेलर विशेषकरून सामान्य माणसाला आकर्षित करणारा आहे . समाजाने सौन्दर्याचे पैलू पडले ते किती पोकळ आहेत आणि असतात हे ट्रेलर वरून दिसते .

पहा व्हिडीओ –

Bala- Official Trailer | Ayushmann Khurrana, Bhumi, Yami | Dinesh Vijan | Amar Kaushik, 8th Nov

 

Leave a Comment