धक्कादायक ! पोटच्या मुलानेच केली आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

0
43
Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रोहतक : वृत्तसंस्था – कुटुंबातील एकुलत्या एका मुलानं आपले वडील, आई, बहीण आणि आजीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आरोपी मुलाने आपल्या काही मित्रांच्या साथीने या सर्वांची हत्या केली आहे. पोलीस अनेक दिवसांपासून या हत्याकांडाचा तपास करत होते. अखेर या हत्येचा झाला असून यामधील आरोपी हा दुसरा कोणीही नसून घरातीलच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

या कारणामुळे केली हत्या
हरियाणातील रोहतकमध्ये प्रदीप मलिक, त्यांची पत्नी, मुलगी नेहा, सासू आणि मुलगा अभिषेक राहत होते. प्रदीप मलिक यांनी या घराची वासरदार म्हणून मुलीचं म्हणजेच नेहाचं नाव लावलं होतं. हे गोष्ट अभिषेकला रुचली नाही. घर आपल्याच नावे असावं, यासाठी तो आग्रही होता. त्याशिवाय इतर छोट्या मोठ्या कारणांवरून त्याचे घरच्यांशी सतत भांडण होत होते. एक दिवस अभिषेक घरात नसताना हल्लेखोर घरात घुसले आणि सर्वांना त्यांनी गोळ्या घातल्या. कुटुंबातील प्रत्येकाच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली.या घटनेत तिघे जागीच ठार झाले, तर नेहा गंभीर जखमी झाली. नेहाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता पोलिसांना धागेदोरे मिळायला सुरुवात झाली.

अशा प्रकारे लागला आरोपीचा शोध
हत्येचे कुठलेच धागेदोरे बाहेर सापडत नसल्यामुळे पोलिसांना अभिषेकवरच संशय आला. घराची किल्ली बाहेर कशी गेली, याचा शोध घेताना पोलिसांना अभिषेकवर संशय आला. यानंतर पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच अभिषेकने आपला गुन्हा मान्य केला. त्याच्या मित्रांनीच ही हत्या केली असून पोलिसांना त्यांच्याकडे अभिषेकच्या घराची किल्लीसुद्धा मिळाली आहे. पोलिसांनी अभिषेकला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रॉपर्टीच्या मोहापायी 20 वर्षांच्या एकुलत्या एका मुलाने सर्व कुटुंबाची हत्या केल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here