प्रियकराने साखरपुड्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 5 वर्षांपासून प्रेमसंबंध असणाऱ्या प्रियकराने साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हि घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील बोराटे वस्तीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तरुणासह त्याच्या घरातील अन्य सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
या प्रकरणातील आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव पुर्णा बंशपती चौधरी आहे. ती खराडी परिसरातील चंदननगर या ठिकाणची रहिवाशी आहे. तिचे मागच्या 5 वर्षांपासून आरोपी कपिल मदन गोरे याच्याशी प्रेमसंबंध होते. यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला होकारसुद्धा दिला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी या दोघांचा वाघोली येथील कपिला रिसॉर्टमध्ये साखरपुडा झाला होता. यानंतर कपिल इतर आरोपींच्या सांगण्यावरून तरुणीसोबत लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. यामुळे या तरुणीने आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली यामध्ये तिने आपल्या आत्महत्येचे कारण लिहिले आहे. यानंतर पोलिसांनी त्या तरुणीचे वडील बंशपती रामशरण चौधरी यांच्या तक्रारीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कपिल मदन गोरे, मदन गोरे, संगिता मदन गोरे, शुभांगी मदन गोरे, विशाल काळे आणि नरसिंह मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.