विसर्जन मिरवणुकीत नाचण्यासाठी मुले, मुली हवेत! त्या एका जाहिरातीची गावभर चर्चा

ganesh visarjna
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेश उत्सव सण हा अवघ्या दहा दिवस चालतो. या दहा दिवसांच्या काळामध्ये गणेश भक्तांकडून मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चा केली जाते. त्यानंतर 10 व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी धुमधडाक्यात मिरवणूक काढली जाते. सध्या याच मिरवणुकी संदर्भात एक जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या जाहिरातीमध्ये चक्क गणपती विसर्जन मिरवणुकीत डान्स करण्यासाठी मुले मुली हवेत अशी मागणी करण्यात आली आहे.

येत्या 28 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे. यासाठी पुण्यातील भोसरी येथील एका मंडळाने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये “२७ सप्टेंबर रोजी फक्त एका दिवसासाठी संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीत डान्स करण्यासाठी मुले, मुली हवेत…” असा मजकूर छापण्यात आला आहे. त्याचबरोबर, मुलामुलींचे वय १८ ते ३० च्या दरम्यान असले पाहिजे आणि एका मुलाल ३०० रूपये मानधन मिळेल असे देखील सांगण्यात आले आहे.

आजवर आपण नोकरीसाठीच्या अनेक जाहिराती पाहिल्या आहेत. मात्र विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी मुले मुली हवी असल्याची जाहिरात पहिल्यांदाच प्रसिद्ध झाल्यामुळे ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांकडून या जाहिरातीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. काहीजण तर, बेरोजगार तरुणांसाठी ही जाहिरात काढण्यात आली असल्याचे म्हणत आहेत. मात्र कारण काही असले तरी, ही जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे.