हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताने कोरोना लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता. भारताने ही ब्राझीलला त्यांच्या प्रतिकूल काळात मदत करत कोव्हिशील्डच्या 20 लाख डोसने भरलेल्या दोन विमानं मुंबई विमानतळावरून ब्राझील आणि मोरोक्कोला रवाना झाली. देशाच्या या मोलाच्या योगदानामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी भारताचं कौतूक केलं आहे
कोरोना प्रतिबंधात्मक लसींची खेप ब्राझीलला पोहोचल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी आनंद व्यक्त केला. भारतानं ब्राझीलला तब्बल २० लाख डोस पाठवले आहेत. बोलसोनारो यांनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचं छायाचित्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “जागतिक समस्येला दूर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये सामील एक मोठा सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. ब्राझीलला कोरोना प्रतिबंधात्मक लसींची निर्यात करण्यसाठी धन्यवाद,” असं ट्वीट ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी केलं आहे. तसंच त्यांनी हिंदीमध्येदेखील धन्यवाद लिहीत भारताचे आभार मानले आहेत.
– Namaskar, Primeiro Ministro @narendramodi
– O Brasil sente-se honrado em ter um grande parceiro para superar um obstáculo global. Obrigado por nos auxiliar com as exportações de vacinas da Índia para o Brasil.
– Dhanyavaad! धनयवाद pic.twitter.com/OalUTnB5p8
— Jair M. Bolsonaro (@jairbolsonaro) January 22, 2021
सगळ्यात विशेष बाब म्हणजे जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सनारो यांनी अॅस्ट्रॅजेनेका लस खरेदीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी भारताला लवकरात लवकर 20 लाख डोस देशात पाठवण्याची विनंती केली होती. मिळालेल्या अहवालानुसार, वेळीच लस उपलब्ध न झाल्यामुळे ब्राझील इतर प्रादेशिक देशांच्या तुलनेत लसीकरणात मागे पडला होता. पण अखेर भारताच्या मदतीने तिथे आरोग्य सेवा सुरळीत झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’