पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा?? ; निलेश राणेंनी पुन्हा अजितदादांवर साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यात वाकयुद्ध बघायला मिळत आहे. आता निलेश राणे पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधताना थेट शरद पवारांवर तरी अजित पवारांचा विश्वास आहे का?? असा थेट सवाल केला आहे. अजित पवार यांना नुकताच तुम्ही लस कधी घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा परवानगी मिळाल्यानंतर मी लस घेईन, असे अजितदादांनी सांगितले होते.

अजित पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत निलेश राणे यांनी खोचक शैलीत ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा, असा सवाल निलेश राणे यांनी अजितदादांना विचारला आहे.

नक्की काय म्हणाले अजित दादा –

पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे. आम्हाला ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला सांगू, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like