नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची निवड केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ ते भाजप असा प्रवास केलेले चंद्रकांत पाटील आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. भाजप मध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे अत्यंत महत्वाचे पद मानले जाते. ते आज चंद्रकांत पाटील यांनी आपल्या नावे केले आहे.
Chandrakant Patil appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra. pic.twitter.com/Qoa8R3VBqX
— ANI (@ANI) July 16, 2019
चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदासोबत मंत्री पदावर देखील कायम राहणारआहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वातच लढल्या जाणार आहेत. त्याच प्रमाणे आपल्या निवडणूक कौशल्याने भाजपमध्ये अलीकडच्या काळात मोठे नाव कमावलेले चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर कसे नेमले गेले या बद्दल भाजपचे अनेक आणि विरोधक देखील अचिंबीत झाले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची आज घोषणा केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आधी नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी या पदावर काम केले आहे. चंद्रकांत पाटील मंत्री असताना देखील पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत होते. याचीच पोच पावती म्हणून पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्ष हे मनाचे पद दिले आहे.