परभणीतील 9 संशयीत रुग्णांचे स्वॅब राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणीकरांसाठी दिलासादायक बातमी असून अद्याप पर्यंत जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या संशयित रुग्णांमध्ये एकाही रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले नसल्याने अजून तरी जिल्ह्यात कोरोणा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांना बळी पडू नये व काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालयात एकूण १२१ रुग्णांची नोंद झाली असून ७४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी ४४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १५ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. एकूण १५ स्वॅबबाबत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

जिल्ह्यात परदेशातून आलेले व त्यांच्या सहवासातील एकूण ५४ नागरिक निगराणीखाली असून यापैकी १४ नागरिक रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाले आहेत. १०७ नागरीकांचे त्यांच्या घरी विलगीकरण करण्यात आले आहेत. त्यांची वैद्यकीय पथकामार्फत फेरतपासणी करण्यात येत असून या १०७ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. काल नवीन ८ संशयीत नागरिकांची जिल्हा रुग्णालय व अधिनस्त संस्थेत नोंद झाली. तर कोरोना बाह्यरुग्ण विभागात १३७ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. बुधवारी ९ रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्ह्यात बुधवार दि. २५ मार्च सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना विषाणु बाधीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगु नये तसेच अफवावर विश्वास ठेवू नये. असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी कळविले आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment