शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही- जितेंद्र आव्हाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाराष्ट्रात सीएए  लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर सीएए लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का? अशी जळजळीत टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केली आहे. नालासोपारा येथील एका कार्यक्रमात शेलार यांनी शेलार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानावरून नवा राजकीय आता वाद निर्माण झाला आहे.

शेलार यांनी केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही. महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे,” असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत शेलार यांना दिलं आहे.

आव्हाड आपल्या ट्विटमध्ये लिहितात “उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असं जाहीर निवेदन करणं आशिष शेलार यांना शोभत नाही. आणि होय मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही,” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ”संसदेत पारित कायदा मान्य करणे. देशाचे संविधान मान्य करणे ही महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ख्याती आहे. संसदेचे कायदे आणि संविधान मान्य नाही का? याचं उत्तर राष्ट्रवादीनं द्यावं. जितेंद्र आव्हाड तुम्हाला प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंकडे रोख नाही,” असं शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

चीनमधून मालदीवच्या ७ नागरिकांची भारताने केली सुटका; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

चाकुचा धाक दाखवून घरातील दागिणे लंपास

कोटींच्या अपहार प्रकरणातील फरार मुख्याधिकाऱ्यास बेड्या; आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Leave a Comment