हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसचा संसर्ग जलद गतीने वाढत असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. या आजाराने देशभरात ९ जणांचा बळी घेतला आहे. जगभरात तर या व्हायरसचामुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत.
करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ तसंच ५४८ जिल्हे लॉकडाऊन आहेत.चंदीगड, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मीर, नागालँड, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपुरा, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर, तामिळनाडू, केरळ, हरियाणा, दमण-दीव-दादरा नगर हवेली, पुदुच्चेरी, अंदमान-निकोबार बेट, गुजरात, कर्नाटक, आसाम ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ करण्यात आली आहेत. ३१ मार्चपर्यंत देशभरात ट्रेन, बस सेवा, मेट्रो सेवा, दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरु राहणार आहेत.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.