मुंबई । राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर राज्यात वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाची लागण झालेले १२१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २ हजार ४५५ वर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज आढळलेल्या कोरोनाच्या १२१ नव्या रुग्णांपैकी ९२ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत.
121 new COVID19 positive cases reported in the state today; the total number of positive cases in the state rise to 2,455: Maharashtra Health Department pic.twitter.com/C1O0UwW4pv
— ANI (@ANI) April 14, 2020
तर दुसरीकडे भारताच्या इतर राज्यात सुद्धा करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून करोनाबाधितांची संख्या 10 हजाराच्या पुढे गेली आहे. तसंच मृतांची संख्या ३६० वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजार ६२० इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात १ हजार २११ कोरोनाचे नवे रुग्ण देशात आढळले असून ३१ जणांचा कोरोनानाने बळी घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”