हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही कोरोनाबाधित रुग्ण इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्याला करोनाची लागण झाल्याचे माहित असून सुद्धा ४ पॉझिटिव्ह रुग्णांनी रेल्वेने प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली असून करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून मुंबईत आलेल्या ४ करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी १६ मार्चला मुंबई ते जबलपूर असा रेल्वेने प्रवास केला. गेल्या आठवड्यात ते दुबईहून मुंबईला आले होते. हे चौघे जण ११०५५ गोदान एक्स्प्रेसने मुंबईहून जबलपूरला गेले. या घटनेनंतर रेल्वेने संबंधित सर्व यंत्रणांना माहिती दिली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं अजूनही लोकांमध्ये करोनाचे गांभीर्य नसल्याचे या घटनेतून दिसून आलं आहे.
दरम्यान, देशभरात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. देशात करोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या २५० पार पोहचली आहे.तर राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ministry of Railways: Railways has found that 4 passengers who travelled on Godan Express (Train 11055) from Mumbai to Jabalpur on March 16 have been tested positive for #COVID19. They came to India from Dubai last week. All concerned have been alerted to take necessary action.
— ANI (@ANI) March 21, 2020
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.