”मी CAA ला समर्थन दिलेलं नाही”- राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र । मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.मात्र, आता राज यांनी याबाबत आता नवीन खुलासा करत मी सीएएला कधीही समर्थन दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

आपल्या वक्तव्याच्या प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं राज ठाकरे असं राज यांनी म्हटलं. माझं सीएएला समर्थन नसून बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला असं म्हणालो होतो. पण याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण राज यांनी यावेळी दिलं.

सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देण्यासंबंधी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक राज यांनी कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी बोलावली होती. मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मतांतर असून नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

देशद्रोहाचा आरोप असलेल्या शार्जील इमामला पोलिसांकडून अखेर अटक

मोदी सरकार देशात हिंसाचार पसरवित आहे; राहुल गांधीचा आरोप

भीमा – कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार?