पुणे प्रतिनिधी । स्वप्निल हिंगे
पती पत्नीत किरकोळ कलह होतच असतात. परंतू जर या कालहाच रूपांतर मोठ्या वादात झालं तर गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊ शकते. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट थेरगाव येथे घडली आहे. घटस्पोट मिळवण्यासाठी डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात एच.आय.व्ही. चे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीसांनी पतीसह, सासू-सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.AIDS
हाती आलेल्या माहितीनुसार, सदर जोडप्याचा विवाह मे २०१५ मधे झाला होता. मात्र लग्न झालेल्या दिवसापासून विवाहित महिलेवर पती उमेश कडून ‘माहेरून पैसे घेऊन ये’ अशी जबरदस्ती होत होती. महिलेने माहेरच्यांकडून पैसे घेऊन येण्यास नकार दिल्याने तिचा प्रचंड छळ करण्यात येत होता. गेल्या काही दिवसांपासून सासरकडचे लोक विवाहितेने घटस्पोट द्यावा असा आग्रह करत होते. परंतू विवाहित महिला घटस्फोटही देत नाही आणि माहेरकडून पैसेही आणत नाही म्हटल्यावर पतीने मानवतेला काळीमा फासत स्वत:च्या पत्नीच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडले. परिणामी महिलेला एड्सची लागण झाली. सदर प्रकरण लक्षात येताच महिलेने वाकड पोलीसांत तक्रार नोंदवली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, पिडीत महिला २७ वर्षाची असून पिंपळे सौदागर येथे तिचे माहेर आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर महिलेचा पती, सासू,सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस निरिक्षक एस. जे. गोडे अधिक तपास करत आहेत.
इतर महत्वाचे –