इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यात १२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यतल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता अकरा वरून २३ वर पोहोचली आहे. संपूर्ण राज्यात सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वात जास्त आढळल्याने खळबळ उडाली आहे. या 12 नव्या रुग्णांमध्ये ६ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश असून त्यांना इन्स्टिट्युशनल कॉरांटाईन मध्ये ठेवण्यात आलं होतं. २५ जणांच्या स्वब चे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी बारा जणांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यामध्ये बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आज पुढे आली आहे. त्यामुळे सांगलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता २३ वर जाऊन पोचले आहे.

इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील ११ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनाने आपल्या हालचाली गतिमान केल्या असून या २३ जणांच्या संपर्कात कोण कोण आलं आहे त्याची माहिती आता घेण्यात येत आहे. हे सर्व पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे इस्लामपूरतील परिवाराचे नातेवाईक तसेच भाऊ बंदकी असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

इस्लामपूर येथील एक मुस्लिम कुटुंबिय हज यात्रेसाठी गेले होते. हज यात्रेवरून १३ मार्च रोजी कुटुंबिय इस्लामपूर शहरात परतले होते. त्यावेळी त्यांना सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवल्याने त्यांनी सांगली सिव्हील येथे उपचार घेतला होता. परंतू त्यावेळी झालेंल्या तपासणीत ते कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे ते कुटुंबिय इस्लामपूर येथे घरी आले होते. शनिवार १४ मार्च ते १८ मार्चच्या दरम्यान ते कुटुंबिय घरीच वास्तव्यास होते. त्यांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सात जणांना कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या सात जनांपैकी पाच जणांच्या स्वॅबचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले. या अहवालानंतर एकाच कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एकाच कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली होती.

या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या २४ जणांना कॉरंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होत. त्यांचे स्वबचे अहवाल पाठवण्यात आले होते. त्यातील १२ जणांचे अहवाल आज पोझिटिव्ह असल्याचे प्राप्त झाले. यामुळे सांगलीती कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २३ वर पोहोचला असून मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

धक्कादायक! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

 

Leave a Comment