“फोन टॅप केला तर कळेल, संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. माझा फोन टॅप केला तर त्यांना कळेल संजय राऊत किती उत्तम शिव्या देतात. मी ज्यांच्याविषयी बोलत होतो, तेच ऐकत असल्याने त्यांना कळलं आम्ही काही मागे हटत नाही.”असा टोला खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊतांनी विरोधकांना लगावला.  ते नाशिकच्या महाकवी कालिदास मंदिरात राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलखतीत बोलत आहेत. उर्जा युवा प्रतिष्ठानने या मुलाखतीचे आयोजन केले आहे.

“पवारांना ईडीची नोटीस आल्यावर पहिल्यांदा डोक्यात ठिणगी”

महाराष्ट्रातील राजकारणातील बदलांची सुरुवात शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर झाल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यावरच पहिल्यांदा डोक्यात ठिणगी पडली. एकदा भीती मेली की माणूस पुढे जातो. तुरुंगात टाकायचं आणि राज्य करायचं ही आणीबाणीची परिस्थिती पुन्हा येता कामा नये, असंही राऊत यांनी नमूद केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com