हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. परंतु गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स (एलटीसीजी) कराबाबत कोणतीही घोषणा केल्याने बाजाराची मनस्थिती खराब झाली आहे. ज्यामुळे आज व्यापाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 800 अंकांनी खाली आला. त्याचबरोबर निफ्टी 300 अंकांनी खाली आला.
याआधी सेन्सेक्स आजच्या व्यापारात 250 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला आहे आणि तो 40500 च्या पातळीच्या खाली गेला आहे. त्याचबरोबर निफ्टीही 60 अंकांनी खाली घसरला आणि तो 11900 च्या खाली गेला. याआधीही गुरुवारी आणि शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
मोदी सरकारने आजवर सादर केलेल्या 6 पूर्ण संकल्पापैकी 4 अर्थसंकल्पा दरम्यान शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. तथापि, गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात सेन्सेक्स 0.6% ने वाढला होता. बजेटच्या दिवशी जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित घोषणा केली जाते तेव्हा त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही चढ-उतार होतो.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
मोदी सरकारचा अर्थसंकल्प गुंतागुंतीचा – राहुल गांधी
वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आतापर्यंतच सर्वात लांब भाषण; भाषण अर्धवट सोडून थांबल्या