Breaking News । केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली, प्रतिनिधी ।  नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी अखेरचा श्वास घेतला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.

बेळगाव लोकसभा मतदार संघाचे ते खासदार होते. ते सलग 2004 पासून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.  कोरोना विषाणू संसर्गाचा बळी म्हणून पहिले  केंद्रीय मंत्री ठरले आहेत. ते 65 वर्षांचा होते.

११ सप्टेंबरला ते पॉझिटिव आल्याचे त्यांनी ट्विट करीत कळवले होते. तेव्हा त्यांना कुठलीही लक्षणे नव्हती. आपली प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केलं होते.

मात्र गेल्या दोन आठवड्यापासून त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावली व आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे.


You might also like