नवी दिल्ली प्रतिनिधी | सकाळी जम्मू काश्मीरमध्ये भारतीय हवाई सीमेत दाखल झालेल्या तीन पाकिस्तानी विमानांपैंकी एका एफ-१६ विमानाला भारतीय वायुसेनेनं लाम सेक्टरमध्ये पाडलं. तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एक भारतीय वैमानिकही जिवंत हाती लागल्याचा दावा केला आहे.
काही वेळेपूर्वी एयर व्हाईस आरजीके कपूर आणि परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी मीडियासमोर पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी एक भारतीय वैमानिक बेपत्ता असल्याचंही स्पष्ट केले आहे. भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान बेपत्ता आहे. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी जम्मू-काश्मीरच्या भागात घोसखोरी करून बॉम्ब हल्ला केला. मात्र या हल्ल्यात काही नुकसान झाले नाही.
भारतीय वायुसेनेने चोख प्रतिउत्तर दिल्यावर पाकिस्तानी विमानांनी पळ काढला.मात्र या कारवाईत भारताचे मिग २१ विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या कारवाईत भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. हा वैमानिक आमच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे, याची चौकशी करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.
इतर महत्वाचे –
बडगाम येथील चॉपर आम्ही पाडले नाही – पाकिस्तानची कबुली