मुंबई प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील बालेवाडी येथे दोन भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. त्यांनी या प्रकरणात गैरव्यवहार केल्याने त्यांनी राजीनामा दावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
पुण्यातील बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी राखीव असणारा भूखंड चंद्रकांत पाटील यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सचे उमेश वाणी यांना मिळवून देण्यास मदत केली आहे. या जागेवर खेळाचे मैदान मंजूर झाल्यानंतर आता जमीनच सरकारच्या ताब्यात नसल्याचा खुलासा झाला आहे. याबाबत तक्रार झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले. तर तक्रार दाखल झाल्यानंतर महसूल अधिकाऱ्याने जमिनीवर असणाऱ्या शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या तांब्याला स्थगिती दिली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी हि जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या मालकीची होईल असा निकाल दिल्याने या प्रकरणात अपहार झाला आहे. तर उमेश वाणी या बिल्डरने संबंधित भूखंडावर ३०० कोटी रुपयांची प्रॉपर्टी उभा केला आहे.
वरील प्रकरणाबरोबरच पुण्यातील हवेली तालुक्यातील केशनंद येथील २३ एकर म्हातोबा देवस्थानची इनामी जमीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल छुगेरा प्रॉपर्टीज लिमिटेड यांना खरेदी करण्यासाठी मदत केली असा आरोप जयंत पाटील यांनी केला. महसूलमंत्र्यांच्या सहमतीने हवेली तालुक्यातील हा भूखंड विकला गेला. या व्यवहारात शासनाला मिळणारा नजराणा स्वरुपातील ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा दावाही पाटील यांनी केला. सर्व कायद्याचे उल्लंघन करून महसूल मंत्र्यांनी हा निकाल दिला असून २३ एकर जमीनीची किंमत २५० ते ३०० कोटींच्या घरात आहे. जयंत पाटील यांनी विधानसभेत हे आरोप केल्यानंतर स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यास आक्षेप घेतला. त्याला चंद्रकांत पाटील यांनी विरोध केला. आपण हे सर्व निर्णय अर्धन्यायिक अधिकारातून घेतले आहेत. त्यामुळे याचे आरोप आपण विधानसभेत लावू शकत नाही. त्यामुळे हे विधानसभेच्या अध्यक्षांनी हे प्रकरण रेकॉर्ड वरून काढून टाकावे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानंतर सर्व चर्चा रेकॉर्ड वरून काढून टाकली. दरम्यान जयंत पाटील यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप लावले आहेत.