अहमदाबाद| कधी काळी मोदींचे कट्टर विरोधक म्हणून गणल्या जाणाऱ्या ऑल्पेश ठाकूर यांनी या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मागील काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांच्या सोबत काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले धवलसिंह झाला यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Ahmedabad: Alpesh Thakor & Dhaval Singh Zala join Bharatiya Janata Party (BJP) in presence of Gujarat BJP President, Jitu Vaghani. pic.twitter.com/qgcHc6RvwT
— ANI (@ANI) July 18, 2019
भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या हस्ते आज अल्पेश ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या नेतृत्वात परीपक्वता नाही हे कारण पुढे करत त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. स्थानिक काँग्रेस नेते आपला अपमान करतात. आपली अवहेलना करतात अशी तक्रार अल्पेश ठाकूर यांनी राहूल गांधी यांच्याकडे केली होता. मात्र त्यांना राहुल गांधी यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे चवताळलेल्या अल्पेश ठाकूर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.
स्मृती इराणी आणि अमित शहा यांच्या लोकसभेत झालेल्या निवडीने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी त्या दोन्ही जागांचे मतदान करताना अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मतदान टाकले होते. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचे पद जाणारच होते. त्याआधीच त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला.
इत्तर महत्वाच्या बातम्या –
आंतरजातीय विवाहाची नोंदणी करायला गेलेल्या प्रेमीयुगूलाला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण
युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार
आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात