नवी दिल्ली | लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. ते भाजपचे तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या फळीच्या नेत्याला लोकसभेचे अध्यक्ष बनवून सर्वांना अवाकच केले आहे. तर भाजपचा नम्र चेहरा म्हणून ओम बिर्ला यांचे नाव घेतले जाते.
ओम बिर्ला यांना शालेय जीवना पासूनच राजकारणाची आवड आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्या आधी ते शालेय जीवनात सुद्धा त्यांच्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी राहिले आहेत. बिर्ला यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी प्रतिनिधी पदाची जी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीला त्यांना हार पत्करावी लागली. तीहार केवळ एक मताने झाली होती. अपक्ष निवडणूक लढवून फक्त एका मताने पराभूत झालेल्या ओम बिर्ला यांची राजकीय चुणूक राजकीय नेत्यांनी हेरली आणि त्यांना पक्षीय संघटन बांधण्याची जबाबदारी दिली. पुढे ओम बिर्ला हरलेली निवडणूक पण जिंकले आणि एक एक राजकीय पायरी चढत आज लोकसभेचे अध्यक्ष झाले आहेत.
कधी काळी वर्गाचे मॅनेटर राहिलेले ओम बिर्ला आता लोकसभेचे मॅनेटर झाले आहेत. आधी काळी भाजप नेते भैरवसिंग शेखावत यांचे निकटवर्तीय राहिलेले ओम बिर्ला आता मोदींचे निकटवर्तीय झाले आहेत. जो नेता आपला प्रतिस्पर्धी होणार नाही अशाच नेत्यांना मोदी मोठी पदे देतात असे बोलले जाते आहे. याच सांकल्पनेला साधून नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या अध्यक्ष पदी ओम बिर्ला यांची निवड करून सर्वांना धक्काच दिला आहे.