नवी दिल्ली | अमित शहा आणि काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात झडलेल्या कलगीतुऱ्या नंतर 370कलमासंदर्भातील दुरुस्ती विधेयक लोकसभेत देखील संमत झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 370 तर विरोधात 70 पडली आहेत.
The Jammu & Kashmir Reorganization Bill, 2019 has been passed by Lok Sabha with 370 ‘Ayes’ & 70 ‘Noes’ https://t.co/aGZLwcdT3N
— ANI (@ANI) August 6, 2019
३७० कलमासंदर्भातील दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने हे विधेयक कायद्यात रूपांतरित होणार आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसात कश्मीर कायदेशीर दृष्ट्या केंद्रशासीत प्रदेश म्हणून समोर येईल.
Government in Lok Sabha proposes to withdraw The Jammu & Kashmir Reservation (Second Amendment) Bill 2019. pic.twitter.com/cHGOP8I46U
— ANI (@ANI) August 6, 2019
दरम्यान काल राज्यसभेत हेच विधेयक १२५ विरुद्ध ६१ अशा फरकाने संमत झाले आहे. राज्यसभेत देखील या विधेयकावर मोठी वादळी चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मतदानाला टाकण्यात आले. त्यावर मतदान झाल्यानंतर हे विधेयक राज्यसभेने स्वीकारल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांची पाठ थोपटली.