भाजपचे नेते मंत्री होण्यात रममाण ; भाजप प्रदेशाध्यक्ष पद पडले ओस

मुंबई प्रतिनिधी | भाजपचे नेते मंत्री होण्यात रममाण झाले आहेत आणि अशा अवस्थेत प्रदेशाध्यक्ष पदाला कोणी वालीच उरला नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. कारण भाजपमध्ये एक व्यक्ती दोन पदावर राहू शकत नाही. तरी देखील रावसाहेब दानवे यांना मंत्री पदासोबतच प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील रुबाब बहाल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद म्हणजे राष्ट्रपती पदासारखेच शोभिवंत पद झाले आहे. अशात कोणीच खानदानी मराठा भाजपला नगवसल्याने प्रदेशाध्यक्ष पद रिक्तच राहणार काय असे चित्र सध्या भाजपच्या राज्य पटलावर दिसते आहे. रावसाहेब दानवे यांच्या नंतर ज्यांची नावे चर्चेत होती त्या नेत्यांना राज्यमंत्री मंडळ विस्तारात मंत्री पदे देण्यात आली. मग आता या पदी कोणाची नेमणूक केली जाणार या चर्चा सुद्धा बंद झाल्या आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना या पदावर कायम ठेवणे म्हणजे भाजपच्या आजवरच्या कडक शिस्तीचा काडीमोड घेण्यासमान आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने येत्या काळात प्रदेशाध्यक्ष पद भरले जाईल अशा अंदाज आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार हे पाण्यासारखे राहणार आहे. तर कोणत्या तरी मंत्र्याला पक्ष कार्यासाठी पदमुक्त केले जाणार हे मात्र अटळ आहे. परंतु नेमक्या कोणत्या मराठा नेत्याला पद सोडावे लागणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.