भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड

धुळे प्रतिनिधी |  घरकुल योजनेत भष्टाचारा केल्याच्या प्रकरणात तुरुंगाच्या सानिध्यात असणारे काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या अडचणीत अधिकच वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. कारण त्यांच्या नावे आणखी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. द्वारकाधीश उपसा सिंचन प्रकरणात हेमंत देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणीदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द्वारकाधीश उपसा सिंचन योजनेत हेमंत देशमुख यांनी आपल्या अधिकार पदाचा गैरवापर केले असे एसीबीने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. सहाय्यक निबंधकाच्या आदेशानंतर आता त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत पाटील यांच्यासह तत्कालीन जिल्हा बँकेचे अधिकारी देखील या प्रकरणी दोषीआहेत. तर हेमंत देशमुख हे सध्या घरकुल घोटाळाप्रकरणी पोलीस कोठडीत आहेत.

घरकुल घोटाळा प्रकरणी हेमंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संबधितांना उच्च न्यायालयात जावे लागले होते. त्याच प्रमाणे त्यांनी कायद्याचा गैर वापर करत या खटल्यातून बाहेर राहण्याचा खुप प्रयत्न केला मात्र त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावताच त्यांना कोर्टातच अटक करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली होती.