कर्नाटकात राजीनामा दिलेल्या आमदारांचे फडणवीस कनेक्शन ; आज मुंबईत होणार भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |कर्नाटक विधानसभेतील १२ आमदारांनी काल आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर असणारे जेडीएस सरकार गोत्यात आले आहे. तर या आमदारांचे फडणवीस कनेक्शन उघड झाले आहे.

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

भाजप पक्ष नेतृत्वांनी पुढील ३ दिवस हे कर्नाटकच्या राजकारणात महत्वाचे असल्याचे लक्षात घेता काँग्रेस राजीमाना दिलेल्या आमदारांची घर वापसी करणार नाही याची खबरदारी घेतली आहे. तसेच या आमदारांची बडदास्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मुसद्दी नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. काल राजीनामा दिलेले कर्नाटकचे १२ आमदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्या नंतर त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल असे बोलले जाते आहे.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले होते आदेश

२२४ सदस्य असणाऱ्या कर्नाटक विधानसभेतील सत्ताधारी पक्षाच्या १२ आमदारांनी राजीनामा दिल्याने मोठी प्रलयाकची स्थिती निर्माण झाली आहे. आता भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण १२ आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटक विधानसभेचा बहुमताचा आकडा १०६ वर आला आहे. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी केवळ एका आमदाराची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कर्नाटकमध्ये भाजप सरकार सत्तेत आलेले दिसेल.