बंगळुरू | कर्नाटकमध्ये चालू असणाऱ्या कर-नाटक अध्यायाची समाप्ती झाली असून येथील राजाने आपल्या सेनेतील बंडखोरी मान्यकरत. बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापेक्षा सत्ता सोडणे पसंत केले आहे. भाजप सोमवारी अथवा मंगळवारी सत्ता स्थापन करू शकते. तुम्ही या आणि सरकार चालवून दाखवा. आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. त्यामुळे तुम्ही देखील सत्ता अशीच चालवून दाखवा असे कुमार स्वामी म्हणाले आहेत.
कुमार स्वामी यांनी आज विधानसभेचे कामकाज सुरु होताच पुन्हा आपले भाषण सुरु केले. या भाषणात त्यांनी त्यांची अडचण आणि कोंडी कशा प्रकारे झाली हे सभागृहाला सांगितले. तसेच त्यांनी भाजपला सत्ता स्थपनेचे संकेत देखील दिले आहेत. भाजप नेते येडियुरप्पा रात्री विधानसभेच्या सभागृहातच झोपले होते. त्यामुळे चर्चेचा विषय ठरले होते. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री कुमार स्वामी हे देखील रात्री दीड वाजेपर्यंत सभागृहातच बसले होते. विधानसभेचे कामकाज आमदारांच्या गदारोळामुळे काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. तर आज दीड वाजे पर्यंत कुमार स्वामी यांना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यांनी बहुमत चाचणी नघेताच सत्ता सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कुमार स्वामी कोणत्याही क्षणी सरकार सोडण्याची शक्यता आहे.
दरम्यान कुमार स्वामी यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले शेवटचे भाषण खूपच भावनिक केले होते. या भाषणात त्यांनी एक अत्यंत भावनिक विधान केले होते. मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या सरकारला पडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मी देवाला आजही विचारतो आहे. अशा परिस्थितीत मला मुख्यमंत्री का बनवले होते असे कुमार स्वामी म्हणाले आहेत. भाजपने पक्षांतर बंदी कायद्याचे हनन केले आहे असा देखील आरोप कुमार स्वामी यांनी सभागृहात केला आहे.