पुणे प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत २२ जुलै रोजी पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी एका महिला पदाधिकाऱ्याची पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी छेडछाड केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिला कार्यकर्त्याने सोशल मीडियात पोस्ट लिहून या संदर्भात निषेद व्यक्त केला. त्यानंतर हे प्रकरण दडपून टाकण्याचा देखील प्रकार करण्यात आला.
२२ जुलै रोजी पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी महिला पदाधिकारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटायला त्यांच्या जवळ गेल्या असता गर्दीचा फायदा घेऊन घेऊन महिला पदाधीकाऱ्याला धक्काबुक्की आणि चिमटे काढण्याचा प्रकार झाला. त्यामुळे हा महिला पदाधिकाऱ्याने सोशल मीडियात या संदर्भात पोस्ट लिहून याचा निषेद नोंदवला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत असा प्रकार होतो आहे म्हणल्यावर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे भाजप आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर या प्रकरणी कारवाही करणार का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे. या आधी देखील भाजपच्या नेत्या शायना एन सी यांच्या बाबतीत असाच एक प्रकार उघडकीस आला होता. शायना एन सी यांच्या फोनवर अश्लील मॅसेज आणि फोन येत होते.या संदर्भात तपास केला असता ते फोन भाजपचेच कार्यकर्ते करत होते हे उघड झाले. महिलांच्या बाबतीत भाजपमध्ये आशे प्रकार घडत असतील आणि ते अशा स्वरूपात चव्हाट्यावर येत असतील तर याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. नाहीतर नरेंद्र मोदी यांचे महिलांनी सन्मान देण्याचे विधान हवेच विरून जाईल.
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट