मुख्यमंत्री ४० आमदारांचे तिकीट कापणार ; आमदारांची हाय कमांडच्या पायावर लोटांगण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |भाजप आपल्या ४० अकार्यक्षम आमदारांची तिकिटे कापणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापण्याचा पुढाकार घेतला आहे. जे आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत अशा आमदारांना फडणवीसांनी घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने जसे काही खासदारांचे तिकीट कापले त्याच धरतीवर देवेंद्र फडणवीस आमदारांना ‘चले जाव’ चा आदेश सुनावणार आहेत. याची भनक आमदारांना लागल्याने आमदार आता हाय कमांडच्या दिमतीला आगळे आहेत. काहीही करा मात्र यावेळी संधी द्या अशा आशयाच्या याचना हे आमदार आत्ता पासूनच पक्ष श्रेष्ठींना करू लागले आहेत.

अकार्यक्षमता, मतदारसंघात संघात नठेवलेला संपर्क, पुन्हा निवडून नयेण्याची शक्यता अशा कारणामुळे मुख्यमंत्री ४० आमदारांच्या मागे लागेल आहेत. त्यांचे तिकीट कापून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना साधी देऊ शकते. तर शिवसेना भाजप १३५-१३५ जागांवर लढू शकतात. तर १८ जागा या मित्र पक्षांना दिल्या जाऊ शकतात. महादेव जानकर आणि विनायक मेटे हे त्यांच्या स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढायला आग्रही आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मित्र पक्षांना किती आणि कोणत्या जागा सोडायच्या याचा निर्णय होईल.

Leave a Comment