नरेंद्र मोदी यांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी पररराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवले आहे. आज सकाळी ९.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांनी मुलगी आणि पती या दोघांचे सांत्वन केले. तसेच सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांची मोठ्या आस्थेने विचार पूस देखील केली. काल रात्री सुषमा स्वराज यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.

आत्ता पर्यंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद , उपराष्ट्र्पती व्यंकय्या नायडू, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, योगगुरु रामदेव बाबा, आदी मान्यवरांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here