नवी दिल्ली | कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय असण्यावर आक्षेप घेत भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता गृहमंत्रालयाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तुम्ही भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवा असा स्पष्ट उल्लेख राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसी मध्ये करण्यात आला आहे.
पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज
१५ दिवसांच्या आत राहुल गांधी यांना गृहमंत्रालयासमोर भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवायचे आहे. तर डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीत राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा दावा केला आहे. २१ सप्टेंबर २०१७ ते २९ एप्रिल २०१९ पर्यत गृहमंत्रालया सोबत सतत पत्र पाठवून राहुल गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वावर सवाल उपस्थित केले आहेत.
आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता
राहुल गांधी यांना गृहमंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसबद्दल कसलेही राजकारण झाले नाही पाहिजे. हि साधारण कायदेशीर प्रक्रिया आहे असे मत केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांचे जर परदेशी नागरिकत्व सिद्ध झाल्यानंतर कायदेशीर दृष्ट्या राहुल गांधी यांना भारतात संविधानिक पदावर राहता येणार नाही. त्यामुळे वरवरून सोपे दिसणारे हे प्रकरण अधिकच गहन आहे.