Breaking News | नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात १५ जवानांचा मृत्यू ; दिवस दिवसभरातील दुसरी घटना

0
44
cfa f c bcf
cfa f c bcf
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक

आज मध्यरात्री दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज १५ जवानांना शहीद व्हावे लागल्याने पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे.

आजच मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला. त्यात १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. घटनास्थळावर अजूनही पोलिसांची नक्षल्यांशी चकमक सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here