BREKING NEWS : पंढरपूर- मंगळवेढ्यात अखेर भाजपचं “समाधान”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज (2 मे) मतमोजणीचा दिवस होता. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आले असल्याने मतमोजणी संथगतीने होत होती. अखेर पंढरपूर- मंगळवेढ्यात भाजपचे समाधान आवताडे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले आहेत. यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या या निवडणुकीची उत्सुकता आता या निकालाने संपली आहे.

पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे नशीब आजमावत होते. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. पोटनिवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची केली गेली होती. अनेक दिग्गज नेत्यांनी येथे प्रचारसभा मोठमोठ्या घेतलेल्या होत्या.

ऐन कोरोनाच्या उद्रेकामध्ये ही पोटनिवडणूक घेतली गेली होती. अनेक सामाजिक माध्यमांवर होत असलेल्या प्रचार सभा आणि निवडणूक प्रचारावर टीकाही करण्यात आली होती. तसेच राज्यसरकारने कलम 144 मधून निवडणूक क्षेत्राला वगळण्यात आल्यामुळे यावर मोठी चर्चा झाली होती. सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या निवडणुकीत लक्ष घातल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. दुपार पासूनच मतमोजणीमध्ये लीड घेतल्यानंतर समाधान अवताडे यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.

 भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर 

मतमोजनीत सुरूवातीच्या काही फेऱ्यां सोडल्यास सर्व फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर दिसत होते. मतमोजणीच्या 30 व्या फेरीनंतर समाधान आवताडे यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात सुरूवात केली होती. पंढरपूर येथे भाजप नेते प्रशांत पारिचारक यांच्या घरी कार्यकर्ते जमले आहेत. तिथे समाधान आवताडे देखील स्वर्गीय सुधारकरपंत परिचारक यांचे आशिर्वाद घेण्यासाठी गेले होते. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाल देखील उधळला आहे.

समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

प्रशांत पारिचारिक आणि सर्व पंढरपुराने ताकद दिली होती. विजय हा जनतेचा आहे. या सरकार विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे. विजय आमचाच होणार आहे., अशी प्रतिक्रिया समाधान आवताडे यांनी दिली.

प्रशांत पारिचारक यांची प्रतिक्रिया काय?

यावेळी प्रशांत पारिचारक यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “आमचा विजय निश्चित होता, फक्त अधिकृत घोषणा बाकी होती. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. त्याचाच यामध्ये विजय बघायला मिळतोय. राज्य सरकारची सगळी यंत्रणा या ठिकाणी होती. तरीसुद्धा लोकांपुढे आम्ही एकत्र गेलो. लोकांना विश्वास दिला. या तालुक्यात आम्ही गेले 30 ते 40 वर्षे काम केलं. सगळ्याच कार्यकर्त्यांनी जिद्दीने जिंकायची आशा केली होती. त्याचाच हा विजय आहे. विरोधकांना निकालाने उत्तर दिलं आहे. मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.