खरेदी खत रजिस्ट्रीसाठी लाच ; सबरजिस्टरारसह एक जण एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद | धनेगाव शिवारातील गट नंबर २८ व गंगापूरपूरमधील दोन खरेदी खतांची रजिस्ट्री करून देण्यासाठी गंगापूर येथील सबरजिस्टर वर्गामध्ये कार्यरत असणारे संशयित लाटे व खासगी इसम कांबळे यांनी तक्रारदाराकडून लाच घेतली. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.

याबाबत माहिती अशी की, गट नंबर – २८ ची रजिस्ट्री करून देण्यासाठी संबंधितांनी ३० मार्च रोजी एक लाख रुपयांची लाच मागणी केली. परंतु तडजोडीनंतर ती रक्कम ७० हजार देण्याचे ठरले. तसेच प्रत्येक रो हाऊससाठी १३ हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली. याबाबतची माहिती लाचलुचपत पथकाला मिळताच पथकाने सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले.

सदरची कारवाई नंदकिशोर शिरसागर, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद व पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांच्या पथकाने केली. या कारवाईदरम्यान पोलीस नाईक अरुण उगले, अशोक नागरगोजे, भूषण देसाई, पोलीस अधीक्षक राजेंद्र सिनकर, चांगदेव, देवीसिंग ठाकूर आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like