मंडपात नवरदेवाची उभे राहण्याची नाही आवडली स्टाईल म्हणून नवरीने केले असे काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विवाहसोहळ्यांमध्ये तुम्ही गोंधळ, वर-वधूचे पूर्वीचे प्रेमी त्यांच्या लग्नात येणे, नातेवाईकांमधील भांडण आणि मग लग्न मोडण्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील वा पाहिल्या असतील. पण आपण कधी ऐकले आहे का की, वधूने यासाठी लग्नाला नकार दिला करण मंचावर उभा असलेला वर तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. उत्तर प्रदेशातील महोबा येथून असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका मुलीने लग्न करण्यास नकार दिला कारण नवऱ्या मुलीला नवरदेवाचे मंडपामध्ये उभे राहण्याची स्टाईल आवडली नाही.

हे प्रकरण महोबाच्या खरेला पोलिस ठाण्यांतर्गत बल्लायम गावशी संबंधित आहे. तीथे राहणारे रतिराम अहिरवार यांनी आपल्या मुलीचे नाते महोबाकांत पोलिस स्टेशनच्या धवर गावात राहणारे रणजित अहिरवार यांच्या मुलाशी केले होते.आणि शेवटच्या तारखेला वर लग्नाच्या मिरवणुकीसह मुलीच्या घरी पोहोचला. जयमालेची तयारी सुरू होती. जेव्हा मुलीला स्टेजवर आणले गेले तेव्हा तिला वरची उभे राहण्याची स्टाईल काही चुकीची वाटली.

यावरून मुलीने अंदाज असा लावला की मुलगा अशिक्षित आहे.

मुलने फक्त त्याच्या उभे राहण्याच्या पद्धतीवरून अंदाज लावला की मुलगा अशिक्षित आहे. मग काय वधूने स्टेजवरच वराला दोनचा पाढा विचारला. हे ऐकताच वराला धक्का बसला आणि तो इकडे तिकडे बघु लागला आणि वराचा पोल उघडकीस आली. यानंतर वधूने तातडीने लग्नास नकार दिला. मुलीचा लग्नाला नकार बघून मग तिला समजावण्याचा टप्पा सुरू झाला. केवळ मुलाकडच्यानी नव्हे तर घरच्यांना पण मुलीला समजविण्याचा प्रयत्न सुरू केला. फक्त घरी आलेली मिरवणूक पाठवू नका असे सांगितले. परंतु मुलीने आपला निर्णय बदलला नाही, अशिक्षित मुलाशी लग्न करण्यास तिने स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण इतके वाढले की पोलिसांना संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी प्रथम दोन्ही बाजूने सलोखा केला आणि नंतर वराच्या बाजूने पैसा वधूच्या बाजूस परत केला.