Wednesday, February 8, 2023

गोकुळ दूध संघ ः क्रॉस वोटिंगने टेन्शन वाढले, सत्ताधारी 9 तर विरोधकांची 7 जागेवर आघाडी

- Advertisement -

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाची मतमोजणीत दुसऱ्या फेरीअखेर सत्ताधारी आघाडीचे 9 उमेदवार आघाडीवर तर विरोधी गटाचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत. अद्याप अजून सहा फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. मतदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगने सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही टेन्शन वाढले आहे. गोकुळची निवडणुक अत्यंत रंगतदार स्थितीत पोहचली असून विजय नक्की कोण मिळवणार हे अद्याप स्पष्टपणे सांगता येणे अवघड बनले आहे.

सकाळी मतमोजणीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला सलग तिसऱ्या जागेवरही विजय मिळाला आहे. त्यानंतर महिला प्रवर्गात विरोधी गटाकडून अंजना रेडेकर तर सत्ताताधी गटाकडून शाैमिका महाडिक यांनी विजय मिळवला होता.

- Advertisement -

आतापर्यंत सुजित मिनचेकर 346, अमरसिंह पाटील 436 या दोन उमेदवारांच्या विजयानंतर तिसरी जागाही विरोधी गटाला मिळाली आहे. बयाजी शेळके 239 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे विरोधी गट सत्ता मिळविणार का याकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत  सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यामध्ये समोरासमोर लढत आहेत.