धक्कादायक ! बहिणीच्या लग्नाआधी विवाहित भावाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जमुई : वृत्तसंस्था – बिहारमधील जमुई जिल्ह्यातील अंबा गावामध्ये एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना (Suicide) घडली आहे. यामध्ये काही दिवसांवर आपल्या बहिणीचे लग्न असताना विवाहित भावाने आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृत भावाचे नाव उमेशकुमार महतो आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
बहिणीच्या लग्नाच्या आदल्या रात्री पत्नीसोबत झालेल्या वादानंतर मृत उमेशकुमारने टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आपल्या आयुष्यचा (Suicide) शेवट केला आहे. त्या रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला, त्यातून दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन केले यामध्ये पतीचा मृत्यू (Suicide) झाला. मात्र गावकऱ्यांनी हि गोष्ट नाकारत फक्त उमेशकुमारने विष घेतल्याचे सांगितले आहे. मृत उमेश कुमार महतोचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते.

शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत उमेश बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. डेकोरेटरचे काम करणाऱ्या उमेशने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी तंबू आणि दिवे लावण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत केले, त्यानंतर पत्नीशी काही गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर त्याने हे टोकाचे (Suicide) पाऊल उचलले. या गोष्टीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय