हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने जलवाहतुकी संदर्भातील नवीन पाऊल सध्या उचललं असून विशेष प्रस्तावानुसार भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.
हा उपक्रम महाराष्ट्राच्या जलवाहतूक सेवेतील मैलाचा दगड ठरणारी घटना असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. या सेवेमुळे किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही जलवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात उल्लेख करताना सांगितलं.
महाविकासआघाडी सरकार पर्यावरण आणि पर्यटन विभागात सध्या महत्वाचं काम करत आहे. याअंतर्गत यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या असून पूर्वनियोजित असलेल्या मांडवा टर्मिनल आणि रो फेरी सेवेमुळे वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळेल असं बोललं जात आहे.