Sunday, February 5, 2023

साताऱ्यात आढळला कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अबुधाबी वरुन आलेला कोरोना संशयित रुग्ण दाखल झाला आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा रुग्ण दाखल झाला आहे. या संशयित तरुणाला खोकला,ताप छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

संशयिताचे सर्व नमुने तात्काळ पुणे येथील लॅबला पाठवण्यात आले आहेत. संशयित रुग्ण मुळचा सातारा जिल्हयातील रहिवाशी असून पुण्यापाठोपाठ आता साताऱ्यातही संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन अधिक दक्ष झालं आहे.

दरम्यान कोरोना विषाणूची धास्ती घेऊन राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्च पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर येथे चित्रपटगृह, जिम, स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’

डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा