हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसभर एनर्जीटिक राहण्यासाठी हेल्थी नाष्टा आवश्यक आहे. परंतु सकाळी कामावर जाण्याची घाई असल्यामुळे झटपट काहीतरी बनवण्याकडे आपला कल असतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक रुचकर मेजवानीची रेसिपी सादर करत आहोत . त्याच नाव म्हणजे ब्राऊन ब्रेड सँडविच… बनवायला अतिशय सोप्पी आणि दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवणाऱ्या ब्राऊन ब्रेड सँडविचची रेसिपी आपण जाणून घेऊया….
ब्राऊन ब्रेड सँडविच रेसिपी साठी लागणारे साहित्य
ब्राऊन ब्रेड
चिरलेला कांदा
देशी तूप
पनीर
हिरवी मिरची
टोमॅटो
टोमॅटो सॉस
चीज
चवीनुसार मीठ
अशी आहे रेसीपी-
सर्वप्रथम 2 ब्राऊन ब्रेड घ्या.
आता दोन्ही स्लाइसवर हिरवी चटणी किंवा सॉस लावा.
एका भांड्यात टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची आणि पनीरचे छोटे तुकडे करून त्याची पेस्ट बनवा.
आता त्यात चवीनुसार मीठ, तिखट आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा.
यानंतर ब्रेड स्लाइसवर मिक्स पेस्ट लावा आणि त्यावर अजून 1 ब्रेडची स्लाइस ठेवा.
आता ब्रेडच्या दोन्ही बाजूंनी तूप लावून ते सँडविच मेकर किंवा तव्यावर भाजून घ्या.
अशा प्रकारे, अवघ्या 10 मिनिटांत हेल्दी ब्रेकफास्ट तयार होईल.