BSNL चा जबरदस्त Recharge Plan; 797 रुपयांत वर्षभर फायदा

bsnl 797 recharge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL चे रिचार्ज प्लॅन हे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेने सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय परवडणारे असतात. त्यामुळे सध्याच्या महागाईच्या काळात कमी खर्चात जास्त फायदे घेण्यासाठी अनेक ग्राहक BSNL ला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी आणि त्यांचा कमी पैशात जास्त फायदे मिळण्यासाठी बीएसएनएल वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅनबाबत सांगणार आहोत, जो एकदा मारला कि वर्षभर डोक्याला झंझट नाही. या प्लॅनची किंमतही अवघी 797 रुपये आहे.

कधी कधी आपल्या मोबाईल मध्ये २ सिमकार्ड असतात. दोन्ही मोबाईल क्रमांक आपल्यासाठी जरी महत्त्वाचे असले तरी एकाच वेळी दोन्ही नंबरवर दार महिन्याला रिचार्ज करणं आपल्याला परवडणारे नाही. अशावेळी बीएसएनएल चा ७९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी नक्कीच वरदान ठरू शकतो. कारण एकदा हा रिचार्ज केला कि नंतर ३०० दिवसांसाठी म्हणजेच जवळपास वर्षभर तुमचे कार्ड वापर न करताही ऍक्टिव्ह राहील, आणि तुमचा नंबर ब्लॉक होणार नाही. या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला कॉलिंग, इंटरनेट, एसएमएस या सुविधाही मिळत आहेत.

काय आज BSNL चा 797 चा रिचार्ज प्लॅन –

BSNL च्या 797 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला भरपूर सुविधा आणि डेटा पॅक मिळणार आहे. 797 रुपयांच्या रिचार्ज मध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल,दिवसाला २ GB हाय स्पीड ४जी डेटा, फ्री एसएमएस अशा सुविधांचा लाभ तुम्हाला मिळत आहे. वरील सर्व सुविधा तुम्हाला पहिल्या ६० दिवसांसाठीच मिळत आहेत. परंतु या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ३०० दिवसांची असल्यामुळे तुमचं इनकमिंग कायम सुरु राहील आणि कार्ड कधी ब्लॉक होणार नाही.